नोटः शेती आणि समस्या या विषयावर लिहिताना, शेतकर्यांच्या बेसिक प्रश्नांनाही सरकार विरोधी अजेंडा, शहरी लोकांच्या करावर चाललेला बाजार अश्या आशयाच्या टीका थोड्याफार प्रमाणात ऐकाव्या लागल्या, परंतु त्यामुळेच शहरी नागरीकाची माणसिकता आणि व्यथा यावर लिहायला घेतले होते, आजपर्यंत मध्यमवर्गीय नोकरदार आणि शहरी नागरीक यांच्या वर जास्त काही लिहिले गेले आहे असे माझ्या वाचनात कधी आले नाही. (असल्यास सुचवा, वाचायला आवडेल)
परंतु 'आरे' या महाराष्ट्रातील चालु घडामोडी नंतर मला छत्तिसगड मधील हसदेव अरण्य आणि त्या वृक्षतोडीमधुन अस्तित्वात येणार्या कोळसा खाणीबद्दल पर्यावरणाशी फारकत घ्यायची नसल्यास त्याबद्दल थोडे तरी लिहिले पाहिजेच असे वाटले...
-----------------------------------------
In Feb - March 2019, The Union environment ministry has given environmental clearance for open cast coal mining in Parsa in Chhattisgarh’s dense Hasdeo Arand forests.
Hasdeo Arand is one of the largest contiguous stretches of very dense forest in central India, spanning about 170,000 hectares
हसदेव अरण्य म्हणजे मध्य भारतातील जपला जावा असा निसर्गसौद्र्याचा खजाना, एलीफंट कॅरीडोर म्हणुन ही प्रसिद्ध असलेला हा भाग, म्हणजे एक प्रकारे प्रकृतीचा हिरवागार गालीचाच म्हणावा लागेल . केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीने (FAC) कोळसा खाणी ला येथे परवानगी दिली आहे. राजस्थान राज्य विधुत उत्पादन निगम लिमिटेड ही mining कंपणी असुन, राजस्थान कोलायरीज लिमिटेड ( Rajasthan Collieries Ltd) ह्या अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड च्या स्टॉक लिस्टेड कंपणीला प्रतिवर्ष जवळजवळ 5 मेट्रीक टन (MPTA) खोदकाम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. हे क्षेत्र ८०० हेक्टरच्या परिसरात आहे. आणि तेव्हडीच जमीन तेथे या कंपणीला अधिग्रहीत करता येणार असलेली परवानगी केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाने दिली आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने हा संवेदनशील विषय आहे, परंतु याचे कोणाला काही पडले आहे असे सध्या तरी दिसत नाही, त्यातच, महाराष्ट्रात 'आरे'आणि त्या अगोदर झालेली जंगलतोड यावर आपण आरोप प्रत्यारोप करतोच आहे, ब्राझील सरकारच्या अमॅझॉन खोर्याला लावण्यात आलेल्या विनाशकारी आगीला, भांडवशाही वृत्तीला आपण कडाडुन विरोध ही करतो आहोत, आणि त्याच वेळेस आपली आपल्या देशातील नैसर्गिक पर्यावरण हाणी आपण डोळ्यासमोरुन बाजुला तर नाही करत ना ? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
ह्या अधिग्रहित होणार्या जमिनीतुन ३ आदिवासी गावे विस्थापित होतील आणि जवळाजवळ १ लाखांवरुन अधीक झाडे तोडली जातील. त्या झाडांबरोबर उपलब्ध असलेल्या अनेक वन्य वनस्पती ही नष्ट झाल्याशिवाय खाण खोदकामाला सुरुवात होणार नाही...
छत्तीसगढ़ बचाओ आंदोलनाचे नेते श्री अशोक शुक्ला , इंडिया टाईम्स ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, केवळ घनदाट जंगलच नाही तर , एलिफंट कॅरीडोरही नष्ट होईल, आणि त्याच बरोबर हायड्रॉलॉजीकल परिणाम त्या आजुबाजुला होऊ शकतात, त्याच बरोबर जंगलावर पुर्णपणे आधारीत असलेल्या आदीवासींची आपण पुन्हा कुठलीच कदर करत नाही आहोत. याही पुढे जाउन छतीसगड बचाओ आंदोलनाचे म्हणणे आहे, की स्थानिक सरकार या वर गप्प असुन , केंद्र सरकारचा हा सारा घाट आहे, आणि त्यात फर्जी ग्रामसभा आणि त्याबद्दलचे फर्जी दस्तावेज देवुन हे निर्णय फिरवले गेले आहेत.
मला मनापासुन वाटते की आपल्याकडे असणार्या मेडीया ने याबद्दल सविस्तर असे विश्लेषन करुन बातमीचे प्रसारण करावे.
माझ्या मनातले
मी काही कोणी कम्युनिस्ट नाही, की माझा कोणत्या विकासालाही विरोध नाही. उलट विकास, शहरीकरण , ग्रामिण अर्थव्यवस्था बळकटीकरण याचा मी पुरस्करता आहे. परंतु विकासाची सुंदर वाट, विनाशकारक मार्गाचा अवलंब करत असेल तर उद्या उध्वस्त होणारे आपले जीवन कोण आणि कसे संभाळेल ?
भांडवलदारांना जंगल , आदीवासी, पर्यावरण यांचे काही देणेघेणे असते हे मला वाटत नाही, परंतु तुम्ही आम्ही, येणारा काळ पर्यावरणाच्या या र्हासा मध्ये कुठे असेल हे सांगता येत नाही..
सरकार , त्यांचे निर्णय आणि त्यांची प्रगती या बद्दल अभिमान असावा, परंतु जर चुक होत आहे असे वाटत असेल तर ते स्पष्ट सांगण्याची ताकद मनात असावी, सक्षम विरोधी पक्ष नसलेल्या या आजच्या लोकशाहीत, विरोधी पक्षाची भुमिका नागरीक आणि मेडीया ने मिळुन का भरुन काढु नये असा मला नेहमी प्रश्न पडतो ..
आणि त्यामुळे मला पुन्हा म्हणावे लागते India Deserves Better
एक आठवण
छत्तीसगड आणि खाणी हा विषय निघाला, आणि शंकर गुहा नियोगी या खाण कामगारांसाठी अखंड अहिंसेच्या मार्गाने लढणार्या माणसाची आठवण न होवो , हे होणारच नाही. ७० च्या दशकात दलली राजहरा ह्या खाणींच्या परिसरात, खाण कामगार, त्यांचे प्रश्न , शासनाचे असलेले दुर्लक्ष याबाबत शांतता मार्गाने केलेल्या त्यांच्या आंदोलनांना सलाम. दु:ख या बाबतीत आहे की, त्यांची ही गोळ्या घालुन हत्या झाली, ती भांड्वलदारांनी केली की अन्य कोणी हे सांगण्याची गरज मला वाटत नाही.
- गणेश जगताप
सोबत दिलेला हसदेव अरण्याचा फोटो नेटवरुन हिंदुस्थान टाईम्स च्या साईट वरुन घेतलेला आहे.
#India_Deserves_Better