India Deserves Better - १. सायकल, पर्यावरण, धोरणे आणि सरकरी उदासीनता

मी स्वता सायकल चालवतो आणि त्या समस्या खुप जवळुन पाहतो आहे, म्हणुन सायकल बद्दल थोडेसे प्रथम बोलतो आहे.

Under a green initiative, the Government should promote cycling as an environment-friendly means of transport, thereby reducing congestion and pollution, especially in big cities. Also, the Government can run campaigns which could show our nation in a positive light, stating that we have a low carbon footprint, as compared with other nations.

Unfair tax, Excise Duty and import export incentives :

खरे तर , सायकल आणि तत्सम इको फ्रेंडली ट्रान्स्पोर्ट गोष्टी सरकारने टॅक्स फ्री करायला हव्यात , किंवा त्याला प्रोमोशनल केले पाहिजे. पण निवडनुकीच्या खैरातीचा टाईम वगळता, सायकल ला कधीच स्वस्त वाहन असे बिरुद मिरवता आले नाही.
मी जी सायकल २०१७ ला २८००० ला घेतली(ही मध्यम सायकल आहे, बसिक पण म्हणु शकता) त्याच हायब्रिड सायकलची किंमत आता २ वर्षात ३९००० झाली आहे, दुकान दाराला विचारले असता टॅक्स मुळे येव्हडेच उत्तर मिळते. तसे गेल्या महिन्यात सायकल वरील टॅक्स कमी झाला आहे असे ऐकले आहे, पण त्यामुळे कुठल्याही किंमतीत मात्र उतार आलेला दिसला नाही.

भारतात १००० लोकांमागे फक्त ९० लोक सायकल चालवतात. आणि हे खेद जनक आहे.
सरकारचे धोरण तर मला कळतच नाही. वाहन उद्योगाला मंदि , पेट्रोल - डिझेल वर वाढवलेले टॅक्स हे सगळे आपल्या समोर असताना, या विना पेट्रोल आणि पर्यावरण पुरक गोष्टीला मुद्दामुन प्रोत्साहन मिळत नाहिये असेच आता वाटत आहे.
माझ्या मनाला तर राहुन राहुन याला जबाबदार पेट्रोलियम पुरवठा दार देश, कार आणि बाईक मॅन्युफक्चरर , पेट्रोलियम पदार्थावरुन मिळत असलेला भरमसाठ टॅक्स आणि मुजोर, आपलेच खरे माणणारे ढिम्म नेते आणि सरकारी यंत्रना कारणीभुत वाटत आहे. आणि का नसावी ?

सबकुच मुमकीन है तो यहा क्या हुआ भाई ? कुठ घोड पेंड खायला गेले ?

कामावर सायकल घेवुन जायला लागलो तर शॉवर पासुन ते वेगळ्या पार्किंग समस्येला तोंड द्यावे लागले .. का ? वाहतुकीसाठी सायकल वापरास प्राधान्य देताना कंपण्याना काहीच अटी घातल्या जावु नये ? का फक्त कंपण्याच्या अटी आपण आणि सरकरणे मान्य कराव्यात ? उलट भरमसाठ वाढणारी शहरे .. अनधिक्रूत बांधकामे आणि वेगाणे वाढणार्या कंपण्या या बरोबरच वाहणे आणि पोलुशन वाढत आहे, अश्या वेळेस , इतर विकासाच्या गप्पा मारण्या पेक्षा येणार्‍या समस्येला तोंड देण्याची ताकद आणि पर्याय आपल्या दिसत नाहीये का ?

Separate Lane

The first and the foremost thing that the government needs to do is make the roads safe for cyclists. The roads of our country are full of rash drivers, law breakers and short tempered people. In such a situation, it becomes imperative to have a separate lane for the people commuting on cycles. This will ensure their security, help them in avoiding the pollution from the cars, and give a better way of avoiding the traffic

ज्या स्मार्ट सिटी मध्ये आमच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड चे नाव आहे, तेथे सायकल साठी सेपरेट लेन धड नाही. जेथे आहेत तेथे अतिक्रमण आहे, मग ते टपर्‍यांचे असुद्या, गाड्यांचे असुद्या नाही तर इतर कश्याचे(कचर्‍याचे म्हणायचे आहे, पण आपण स्वच्छ भारत अभियान अंतर्गत काम करतोय, आणि त्यातही स्मार्ट सिटीमध्ये राहतोय, म्हणुन या अभियानाचा आणि स्मार्ट पणाचा आब जावु नये म्हणुन कचरा हा शब्द मागे घेतो). सरकारी यंत्रना, महानगरपालिका झोपले आहेत काय ? या सगळ्या कडे त्यांच्या पाहण्याचा दृष्टीकोण असा तो काय ?

रस्त्या रस्त्या वर खड्डे आहेत , निट चालता येत नाहिये , गाड्यांचे अक्सिडेंट वाढलेत(ह्या बद्दल विस्त्रुत बोलत नाही आताच, तो एक वेगळाच विषय आहे) ,
२०१६ च्या आकडेवारीनुसार (नंतरची आकडेवारी पब्लिश केली गेली असेल तर कृपया सांगा) २३.९ % अक्सिडेंट टु व्हिलर मोटर चे झाले आहेत आणि सायकलचे फक्त ०.९ %. तरीही सायकल चालविन्या साठी लोकांच्या मनात भीती आहे , का तर फक्त या ढिम्म सरकारी यंत्रणा , लाचखावु लोक, आणि बेसिक रस्ते आणि लेन नसल्याने सायकलचा वापर सरकारला वाढवता आला नाही.

आणि सरकार ह्या विषयात १०० पैकी १० % मिळवुन पुर्ण पणे तोंडावर आपटुन नापास झाले आहे ( १० % लाजे खातर दिलेले आहे, आपलेच सरकार आहे जावुद्या).
ज्यांना कोणाला मोदी है तो मुमकीन है ची हाळी द्यायची आहे, त्याने क्रुपया मन की बात किंवा चाय पे चर्चा अश्या कार्यक्रमात तरी असल्या गोष्टींकडे लक्श द्यायला सांगारे आपल्या या मसिहा ला ..

So I am again saying : #India_Deserves_Better

बाकी या विषया वर तुर्तास थांबतो ... पुन्हा लवकरच भेटु...