मिपाकरांच्या घरचे गणपती

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
} h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}

मिपाकरांच्या घरचे गणपती

नमस्कार मिपाकरांनो,

मिपाची श्रीगणेश लेखमाला सुरू झालीये. सर्वत्र बाप्पा विराजमान झाले आहेत. गणेशोत्सवाची धामधूम चालू आहे.

गणपती ही आराध्य देवता तर आहेच, त्याचबरोबर ती 'लाडकी' देवताही आहे. तो आपली आई आहे, पिता आहे, बंधू आहे आणि सखा तर आहेच आहे.

आपल्या घरी, सोसायटीत, मंडळात, गावातदेखील बाप्पा विराजमान झाले असतीलच. सालाबादप्रमाणे बाप्पा विराजमान झाल्यावर लगेच सर्वांनी बाप्पाचे फोटोही काढले असतील. अरे हो, आजकालच्या प्रथेप्रमाणे सेल्फीसुद्धा काढले असतील, हो ना? तर मग पाठवा आपल्या बाप्पाचे फोटो मिपाला!!

यंदाच्या श्रीगणेश लेखमालेत मिपाकरांच्या लेखन आणि कलाकौशल्याचा आनंद अनुभवण्याबरोबरच त्यांच्या घरच्या गणपती सोहळ्याचं दर्शन घ्यायची संधीसुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

तुमचे फोटो याच लेखाच्या प्रतिसादामध्ये द्यायचे आहेत. फोटो चिकटवण्यात काही अडचण आल्यास साहित्य संपादक या आयडीला तुमच्या मिपा सदस्यनामासह  sahityasampadak.mipa@gmail.com  या आयडी वर ईमेल करा, आम्ही ते प्रकाशित करू.

"बोला गणपतीबाप्पा मोरया!!"