मुलाखत- मनोज जोशी

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}

p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}

a: {
color: #990000;
}

a:link {
text-decoration: none;
}

a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:620px;
padding:10px;
margin: auto;
}
div.chitra1 {
max-width:400px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:300px;
margin: auto;
}

मुलाखत- मनोज जोशी

'मनोज जोशी' या अभिनयसंपन्न कलाकाराचे केवळ नाव घेतले, तरी त्यांनी अभिनित केलेल्या अनेक व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभ्या राहतात. अश्विनी भावे यांच्यासह केलेली 'राऊ' ही त्यांची पहिली मराठी मालिका. मात्र त्याअगोदर ते मराठी आणि गुजराथी नाट्यसृष्टीमध्ये बरीच वर्षे काम करत होते. त्यांच्या उमेदीच्या काळात 'चाणक्य' नाटकात त्यांनी चाणक्याची भूमिका करण्यास सुरुवात केली आणि त्या भूमिकेचे सोने केले. चाणक्य आणि मनोज जोशी हे समीकरण आजही अतूट ठरले आहे.

मनोज जोशी एक अष्टपैलू कलाकार तर आहेतच; मात्र त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ते मराठी, गुजराथी आणि हिंदी भाषा अगदी सहज बोलतात. त्यामुळे या तिन्ही भाषांमधील नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रात ते लीलया संचार करतात. भूमिका कोणत्याही पठडीतली असू दे, मनोज जोशी त्या भूमिकेला योग्य न्याय देतात.

उदाहरणच द्यायचे झाले, तर भूलभुलैया हा चित्रपट खरे तर केवळ अक्षयकुमार आणि विद्या बालन या दोघांचा. मात्र तत्त्वनिष्ठ आणि जुन्या विचारांना मानणाऱ्या काकांची भूमिका मनोजजींनी अत्यंत सच्चेपणे आणि लक्षात राहील अशी साकारली आहे. तसाच 'फिर हेराफेरी'मधील कचरासेठ! ही भूमिकाही लक्षात राहणाऱ्या भूमिकांपैकी एक.

अशा अत्यंत गुणी, मनमोकळ्या स्वभावाच्या मनोजजींची, श्रीगणेश लेखमालेसाठी ज्योति अळवणी ह्यांनी घेतलेली मुलाखत, फक्त तुम्हां मिपाकरांसाठी!