
लागणारा वेळ:
३० मिनिटे(*सफरचंदाचे प्रमाण किती आहे यावर पाककृतीसाठी लागणारा वेळ कमी जास्त होईल)
लागणारे जिन्नस:
सफरचंद
तुप
साखर
वेलची पुड
साय
काजू , बदाम

क्रमवार पाककृती:
१. सफरचंद धुवून ,त्याचे २ काप करुन त्यामधल्या बी काढून किस करुन घ्या
२. कढई मध्ये तुप घ्या
३. तुप गरम होत आलेकी , काजू बदाम तुपावर २ मि. परतून घ्या
४. आता मध्यम आचेवर सफरचंदाचा किस घालून ,सफरचंदातील पाणी कमी होइपर्यंत छान परतून घ्या(मध्ये मध्ये हलवत राहायच आहे )
५. १५ मिनीट झाल्यावर त्यमध्ये साखर ,वेलची पुड घालून ते एकत्र करुन घ्या
७. एकसारख मध्यम आचेवर हलवत राहायच आहे
८. २ मिनीटानी साय घालून एकत्र करुन घ्या
९. मिश्रण जाडसर होईपर्यंत आणि कढईपासून वेगळे झालेकी आपला सफरचंदाचा हलवा तयार आहे

वाढणी/प्रमाण:
२-३
अधिक टिपा:
*खायचा केशरी रंग घातला तरी चालेल (गाजर हलव्या सारखा रंग येईल)
*सफरचंद लवकर काळे पडतात त्यामुळे जेवढे पटकन होईल तेवढे पटकन किसून घ्यावे आणि पाककृती चालू करावी