बाप्पांच्या आगमनाप्रीत्यर्थ २०१९... २

पहिला धागा आता नीट बघता येत नाही, ह्यासाठी हा दुसरा धागा. त्यातील हे लेटेस्ट संभाषण. आता इथे बोलूयात.

कामाच्या उपयुक्त लिंका -

चावडी लिंक - 
https://www.misalpav.com/ankchawadi

चावडीमध्ये साहित्य चिकटवण्यासाठी लिंक -
https://misalpav.com/node/add/diwali-anka-chawadi

यशोधरा - लोकसाहित्य आणि नाट्य, नर्तन आणि त्यातील गणपती ह्या अनुषंगाने एक लेख मिळू शकतो, परंतु खूप मोठा लेख आहे. लोकसाहित्य हा एक भाग माझ्यापाशी आलेला आहे, आणि खरंच मोठा आहे भाग. तर, घ्यायचा का हा लेख?

मंदार भालेराव - तैं लेख घ्यावा या मताचा मी आहे, मोठा असेल तर लेखाचे २-३ भाग करून पोस्ट करू शकतो.

यशोधरा - ठीक आहे मंदार. आलेले कंटेंट मी पोस्ट करून ठेवते. मग ठरवू काय ते. म्हणजे एकाच लेखात सगळे बसवू शकू असे वाटत नाहीये, म्हणून.

गवि - लेखाचा आकार ही मर्यादा इथे ठेवायला नको. भाग केल्याने रसभंग होतो, लिंक तुटते. विशेषांक, लेखमाला हे उपक्रम अखंड असावेत. भाग पाडणे अत्यावश्यक असल्यास असे लेखन स्वतंत्र यावे, विशेष अंक अथवा उपक्रमाचा भाग म्हणून नको. शिवाय अतिदीर्घ अभ्यासपूर्ण लेखन हे अनेकदा (अपवाद वगळून) क्लिष्ट असण्याची शक्यता असते. दिवाळी अंक, विशेषांक यांत साधारणपणे सर्व सामाजिक स्तरांतील सर्वसामान्य लोकांना सहज आकलन होईल आणि मनोरंजन होईल असं crisp लेखन असावं. प्रबंध किंवा जडान्न नसावं. हे व्यक्तिगत मत.

यशोधरा - लेख पोस्ट केला आहे. उरलेला भाग उद्या, परवा मिळेल तसा पोस्ट करते. सगळा पोस्ट झाला की ठरवायचं का?

गवि - अवश्य, वरील मत हे जनरल स्ट्रॅटेजी अशा अर्थाचं मत आहे. बाय ड वे, या धाग्यावर आता "नवीन प्रतिसाद" क्लिक करुन येत नाहीत. शोधावे लागताहेत. बहुधा दुसऱ्या पानावर गेल्याने. तेव्हा याच धाग्याचा दुसरा भाग काढावा अशी विनंती.