गणेश लेखमालिका २०१९ जाहिरात/ टीझर संबंधी

गणपती लेखमालिकेची जाहिरात करुया का असे मी विचारले होते, तेव्हा पैलवान ह्यांनी मागे कसे केले होते ते लिहिले होते, ही त्यांची पोस्ट.

तीन वर्षांपूर्वी दिवाळी अंकाला केले होते.

एक लेख प्रकाशित करता येईल ऑगस्टच्या सुरुवातीला.
श्रीगणेश लेखमाला - झलक १
त्यात एका फायनल झालेल्या लेखाची काही वाक्ये/परिच्छेद/"काय असेल जान्हवीच्या डिलिव्हरीची तारीख" असं एखादं वाक्य टाकायचं.
काही दिवसांनी लेख अपडेट करायचा. आधीचं काढून नवीन लेखाची झलक टाकायची.
असं करत राहायचं.

हीच कल्पना पुढे नेत आपण एक खेळ मिपाकरांसाठी घेऊ शकतो. जाहिरात होईल आणि थोडे वातावरणही तयार होईल असे वाटते.

लेखातील दोन तीन वाक्ये लिहून प्रमोशन करत असताना, आपण मिपाकरांना हा लेख कोणाचा असेल, हे ओळखा, असा खेळ घेऊ शकतो. प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीला टाकायचे आणि आठवड्याच्या शेवटाला उत्तरे जाहीर करायची. जस्ट एक गंमत म्हणून, असा खेळ घेतला तर मिपाकर सहभागी होतील असं वाटतं.

चार आठवडे असा खेळ आपण सुरू ठेवू शकू.

काय वाटते सगळ्यांना? करायचे का? तुमचे मत/ सूचना मांडा प्लीज. अजून काही वेगळे सुचवायचे असेल तरी सुचवा.

धन्यवाद.