-- सोलापूर मध्ये ही भजी आंध्र भजी या नावाने प्रसिध्द आहेत त्यामुळे हे नाव रेसिपीला दिले आहे
लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोठी मिरची
मिरचीसाठी मिश्रण :
धणे+जिरे पुड / जिरे पुड
शेंगदाण्याचे कूट
चिंचेचा कोळ
मीठ
भजीसाठी :
१ वाटी बेसन पीठ (५० ग्रॅ)
२ चमचे तांदळाचे पीठ (२५ग्रॅ)
१ छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा ओवा
कोथिंबीर (optional)
चवीनुसार मीठ
१/४ चमचा सोडा
तेल
पाणी
चाट मसाला / काळे मीठ
बारीक चिरलेला कांदा
क्रमवार पाककृती:
१. मिरची धुवून,पुसून घ्या
२. आता ही मिरची अर्धी कापून घ्या आणि त्यातल्या बिया काढून घ्या ,त्यामूळे मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होईल

मिरचीसाठी मिश्रण :
३.एका वाटीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट ,चवीनुसार मीठ , धणे+जिरे पुड , लागेल तसे चिंचेचा कोळ घालून मिश्रण करावे (मिश्रण जास्त पातळ करु नये )
४. आता हे मिश्रण मिरची मध्ये भरुन घ्या

भजीसाठी :
५. एका भांड्यात बेसन पीठ ,तांदळाचे पीठ , ओवा , मीठ ,हळद एकत्र करुन घ्या .
६. आता थोडे थोडे पाणी घालत मिश्रण एकत्र करुन घ्या (खुप जास्त पातळ नको)
७. आता त्यामध्ये सोडा घाला आणि सोड्यावर १ चमचा मोहन (गरम तेल)घाला ,एकत्र करुन घ्या
८. तळण्यासाठी तेल कढई मध्ये गरम करायला ठेवा
९ . एक एक मिरची मिश्रणात घालून तेलात सोडा आणि तळून घ्या

१०. मस्त आंध्र (मिरची)भजी तयार आहेत ,त्यावर चाट मसाला/काळे मीठ , बारीक चिरलेला कांदा , सॉस (optional) घालून सर्व्ह करा
मस्त गरम गरम संपवून टाका

वाढणी/प्रमाण:
१
अधिक टिपा:
* मोठ्या आणि जाड मिरच्या घ्या,मिश्रण छान भरता येईल
पुर्ण रेसिपीचा व्हिडिओ :