मिशन मिपा-मेकओव्हर

नमस्कार !
‘हल्ली मिपामध्ये रामच नाही राहिला राव !’
हे बर्‍याच मिपाकरांकडून ऐकतेय. मला स्वत:लासुद्धा मिपावर फार मन रमत नाही !
एकेकाळी चोवीस तास गजबज, वर्दळ दंगा असणार्‍या मिपाच अलीकडे बाळसंच हरवलंय !
मिपाला पुन्हा पूर्वीसारखं गुटगुटीत दंगेखोर खेळकर वात्रट कार्टं बनवायची इच्छा आहे का ? सकस, दर्जेदार लेखन देणारे लेखक आणि अशा लेखनाची कदर असणारे जाणकार रसिक यांची मिपावर रेलचेल व्हावी, कढईतल्या पॉपकॉर्न सारख्या तडतडत्या चर्चा नि वादविवाद यांच्या झणझणीत फोडण्यांनी मिपाचे व्यासपीठ ढवळून जावे , असं वाटतं का कुणाला ?
वाटत असेल तर त्यासाठी आपण काय काय करू शकतो हे सुचवण्यासाठी हा धागा.
अ‍ॅडमिन लोक्स मिपा सांभाळायला, वाढवायला समर्थ आहेतच, तथापि त्यांच्या सपोर्टशिवायही आपण बरेच काही करू शकू.
उदा. काही विशिष्ट लेखमाला ग्रुपने सुरू करणे. उदा. भटकंती लेखमाला , पाकृ लेखमाला
धावते धागे साखळी धागे खरेदी, खादाडी इ. सुरू करणे
पांचट धाग्यांवर बहिष्कार टाकणे आणि इतरांनाही असे धागे वाळीत टाकण्यासाठी प्रवृत्त करणे.
चांगल्या धाग्यांना न चुकता प्रतिसाद देणे .
जुन्या जाणत्या लेखकांना व्यक्तीगत संपर्क करून लिहिण्यास विनंती, प्रवृत्त करणे .
आणखी सुचवा ?