साहित्य
मश्रूम : शक्यतो मध्यम आकाराचे अथवा मोठे ( बटन मश्रुम नकोत) आणि बंद डब्यातील तर नक्कीच नको काप करावे इंग्रजी "टी"आकाराचे
झिंगे
ओली हळद ( किसलेली)
आले ( किसलेले)
चिंचेचे पाणी / कोळ
कोरडी मिरची / तुकडे
लेमन ग्रास चा चेचलेला तुकडा
थाई लाल मसाला असल्यास थोडासा
तेलावर मिरची आणि आले / लेमस ग्रास परतावे , थाई मसाला घालावा
त्यावर मश्र्रोम घालून झाकण ना ठेवता परतावे थोडे पाणी तरीही सुटेल ते चालेल
शिजत येताना ओली हळद घालावी
झिंगे वेगळे परतून घयावे ( दंढारे पर्यंत शिजवू नये)
झिंगे वरील भाजीत घालावे व थोडी अजून शिजवावी
सोबत खाण्यास चिकट भात उत्तम
पेय ,, काही सुचत नाही बुवा