मिलिंद भिड़े, भिलाई नगर, छत्तीसगढ़
वीज बिल कमी करण्या साठी योग्य दर्ज्याची वायरिंग, प्रॉपर अर्थिंग,स्टार रेटिंग उपकरणांचा वापर जेव्हड़ा महत्वाच्या आहे, तेव्हड़ेच महत्व घरात असलेल्या उपकरणांच्या रेगुलर सर्विसिंग चे ही आहे ।
घरात असलेला प्रत्येक उपकरण, तो पर्यन्त बिनधास्त वापरला जातो, जो पर्यन्त तो काम करणे बन्द करीत नाही।
घरात असलेल्या प्रत्येक उपकरणाला रेगुलर सर्विसिंग गरजेची असते । घरोघरी आणलेले मिक्सर, ग्राइंडर, वाशिंग मशीन, गीजर, इंडक्शन स्टोव, माइक्रोवेव,फ्रीज़ सुरुवातीला मस्त सर्विस देतात । आपल्या पैकी 95%लोक उपकरणांच्या बरोबर मिळालेले इंस्ट्रक्शन मैन्युअल कधीच वाचत नाही ।त्यामुळे आपल्याला साध्या गोष्टी ही माहित नसतात । आपण सगळे उपकरण "फक्त प्रत्युत्पन्न मति" ने वापरतो ।
उपकरणाचे रेगुलर मेंटेनेंस काय, आणि कसे ह्यांची माहिती सोबत मिळालेल्या माहिती पत्रकात दिलेली असते, पण न वाचल्या मुळे आपण चार आण्याचे काम चार शे रूपयाला करून घेतो , कारण आपण मैजोरिटी ने penny wise, pound foolish आहोत ही सत्य आणि सद्य परिस्थिति आहे ।
मिक्सर सुरुवातीला एकदम शांत चालत असतो, मग त्यात हलकुण्ड, खोबरे, साखर, असल्या गोष्टी ग्राइंड केल्या जातात । ह्यांनी मिक्सर ब्लेड खराब होतो, खालच्या मोटर चे बुशिंग खराब होतात, आवाज़ वाढतो, हळू हळू घरात रेलवे इंजिन आल्या सारखे आवाज़ मिक्सर, ग्राइंडर,फ़ूड प्रोसेसर, मुळे कॉमन होत जातात।
वाशिंग मशीन मध्ये कपड़े स्वच्छ धुतले जात नाहीत,
साबण पाउडर ज्यास्त घालून आपण कपड़े धुतो, पण वॉशर किंवा ड्रायर चे बेल्ट आम्ही बदलत नाही ।
5 मिनिटात गीजर मध्ये तापणारे पाणी 25 मिनिटात तापते, तरी आम्ही लक्ष देत नाही । मग ही वेळ 1 तास होते,तरी आम्हाला सवड नसते । जेव्हा कि गीजर चे हीटिंग एलिमेंट त्यावर कैल्शियम डिपाजिट मुळे आपली एफिशिएंसी गमावतो । पण आम्ही तो डिपाजिट स्वच्छ करण्यास ततपर नसतो ।
सतत वापराने फ्रीज़ चे डोर लाइनर कड़क होतात,त्यामुळे फ्रीज़ चे दार एयरटाइट राहात नाही, आणि त्या मुळे गारवा कमी होत जातो, आतिल वस्तु खराब होतात, फ्रीज़ मध्ये झुरळ सर्रास फिरतात । कुठल्या ही मेडिकल प्रोफेशनल कड़े है दृश्य कॉमन आहे, पण तरी ही आम्ही 450 रूपयाचे डोर लाइनर रेगुलर गरम पाण्याने पुसत सुद्धा नाही, पण महिन्याला 1000 रूपयाचे वीज बिल देत रहातो ।
ह्या सवयिन मुळे वाढत असलेल्या वीज देयका करिता वीज सप्लायर च कसा जवाबदार आहे, हे शोधन्यास सर्व ग्राहक वीज मंडळाच्या कारभारावर शोधपत्र लिहितात, पण आपली चूक शोधत नाही ।
जेव्हा कि मिक्सर चे 10 ते 30 रूपयाचे बुश बदलून, वाशिंग मशीन चे लूज बेल्ट बदलून, गीजर चे हीटिंग एलिमेंट वेळो वेळी डिपाजिट फ्री करवून,फ्रीज़ चे डोर लाइनर नियमित पुसून किंवा बदलून आपला वीज खर्च कमी करता येतो । शेवटी आम्ही काटकसर कुठे करितो, फेसबुक वर येऊन आम्ही अत्यंत साध्या प्रोब्लेम्स चे उत्तर लोकांना विचारतो, पण "आत्म निरीक्षण " करीत नाही, आणि सवयी तर मुळीच बदलत नाही ।
कटु सत्य आहे कि ह्या वाईट सवयिनमुळेच समाजात "संवाद जीवंत" आहे ।
धन्यवाद,