पाणीपुरीची पुरी

IMG_20190130_144015

साहित्य:
पाव किलो - बारीक रवा
मीठ - 1/2 टी स्पून
खायचा सोडा - 1/4 टी स्पून
तेल - 1 टीस्पून
पुर्या तळण्यासाठी 1 टेबलस्पून तेल

पाव किलो रव्यापासून 42 पुऱ्या झाल्या

कृती:

रवा, मीठ, सोडा आणि तेल मिक्स करून थोड थोड पाणी घालुन पीठ घट्ट मळुन घ्या. हे पीठ एका भांड्यात झाकुन अर्धा तास झाकुन ठेवा.
मी सकाळी पीठ मळून ठेवल पण नंतर मला वेळ नव्हता म्हणुन मी संध्याकाळी पाणीपुरीच्या पुऱ्या केल्या तरीही खुप मस्त्त झाल्या.

पीठ पुन्हा मळून चपातीच्या पीठाला गोळा घेतो तेवढा घेऊन चपाती लाटा. पानी पुरी च्या आकारा च झाकण किंवा कडा असलेली वाटी घेऊन त्याने पाणीपुरीचा आकार द्या. सर्व पुऱ्या अशा बनवून घ्या.
IMG_20190130_135044

कढ़ईंत तेल तापवून मिडीयम फ्लेम वर पुर्या तळून घ्या. ह्या पुरया अजिबात तेलक्ट होत नाहीत आणि तळताना तेल पित नाहीत, ख़ुप कमी तेलात तळून होतात.
IMG_20190130_135320

IMG_20190130_142247

टीप:
1.पीठ घट्ट मळून घ्याव.
2.पुरी तळून झाल्यावर जऱ नरम पडली तर ओव्हन मध्ये पाच मिनिट बेक करा.ओव्हन नसेल तर पुरया पुन्हा तळून घ्या