पाण्यातला दरवाजा

wg

एस्ना वॉटर लॉक. नदीवर धरण बांधल्यावर उंच भाग व सखल भाग रस्त्याने घाट बांधुन जोडता येतात पण जलवाहतुकीचे काय? यासाठी उंच भाग आणि सखल भाग या दरम्यान एक गोदी बांधली जाते. एका टोकाला उंचावरचा जलभाग आणि दुसरीकडे सरळ रेषेत खोल भाग. मधोमध गोदी आणि दोन्ही बाजुंना भक्कम दरवाजे. जहाज आत येताना गोदीत पूर्ण पाणी भरले जाते म्हणजे येणार्‍या जहाजाच्या जलपातळीसमान. खोल भागाकडचे दरवाजे बंद केले जातात, समान पातळीवरचे दरवाजे उघडुन जहाज आत घेतले जाते. दरवाजे पूर्ववत बंद होतात. जहाज दोराने गोदीच्या काठावरील दगडी खुंटांना बांधले जाते. मग खोल पाणी असलेल्या टोकाकडचे दरवाजे उघडले जातात व जहाज जागच्या जागी खाली खाली जात दुसर्‍या टोकाच्या पाण्याच्या पातळीवर येते . दोर सोडले जातात व जहाज निघुन जाते व दरवाजे पूर्ववत बंद होतात