आता काहीच दिवसात आगामी लोकसभा 2019 निवडणुका जाहिर होतील व सर्वत्र देशात राजकिय धुमाकुळीचे वातावरण निर्माण होईल यात शंकाच नाही. ही निवडुणक माझ्यासाठी महत्त्वाची कारण मतदान करण्याची ही माझी प्रथमच वेळ आणि घरामध्ये पहिले पासुनच राजकिय वातावरण व राजकीय चर्चा असल्यामुळे थोडी उत्सुकता. आता नव युवक पीढी मध्ये राजकारणा बद्धल थोडी जागरुक झाली हे म्हणणे
चूकीचे होणार नाही. पहिले मतदाना करतांना मदतार हे जात- पात, धर्म इ. गोष्टी मनात ठेवुन मतदान करायचे पण आता युवक विकास व राष्ट्रहित या मुद्यावर मतदान करतील असे चित्र दिसत आहे आणि मतदान करत असताना मतदार वयक्तीक विचार न करता सार्वजनीक विचार करातील हे माझे प्रामाणीक मत आहे. तसेच युवक योग्य देशप्रतिनिधि निवडून देश सुराक्षित हातात देतील अशी अपेक्षा आहे.