लहानगा शंकर्या आज खुप खुश होता. गणपती विसर्जनाची मिरवणुक त्याच्या बैलगाडीतुन निघणार होती. रात्रभर त्याला गाडी सजवायचेच स्वप्न पडत होते.
दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठला तर घरात काळजीचे वातावरण दिसले. नेमके कारण त्याला काही कळेना. आज्ज्याला रात्री छातीत दुखत होतं म्हणुन शहरात न्यायचं एवढच त्याला कळालं. तसाच तोंड लटकाउन तो गाडीत बसला . शहरात गेल्यावर ठिकठिकाणी चाललेली मिरवणुकीची तयारी पाहुन त्याला अजुनच कसतरी होत होतं . दवाखान्याच्या खिडकीतुन मिरवणुक पहाताना त्याला त्याचे बैल व गाडी दिसली. गाडी विकली म्हणुन त्याला बापाचा खुप राग आलेला. पण आज्ज्याचा थरथरता हात पाठिवर जानवला त्याने लगेच आज्ज्याला करकचुन मिठी मारली आणि त्याचा राग कुठल्या कुठे पळाला.