[शशक' १९] - स्ट्रेट ?

चालत्या ट्रेनच्या प्रथम श्रेणीमध्ये बाकावर बसून तो जीनीच्या साडी नेसण्याच्या धडपडीकडे बघत तिला न्याहाळत होता...

"जीनी... आपण पुन्हा भेटणार ना?"
"नाही...."
"काल पहिल्यांदयाच भेटलेल्या मला... तू तुझं सर्वस्व दिलंस मग आता का लाजतेस?"

तिने फक्त जालीम कटाक्ष टाकला आणि आपली बॅग आवरायला लागली

"बोल ना...! का नाही भेटू शकत आपण? भावनिक न गुंतता आपण संबंध ठेऊ शकतोच, जसं आज...."

तो पुढे काही बोलणार तेवढ्यात तिने त्याचे बोलणे तोडले.

"आज..... आज मला फक्त सहा महिन्यापूर्वी झालेल्या शश्त्रक्रियेनंतरचा माझा "परफॉर्मन्स" बघायचा होता, म्हणून मी........."

"शश्त्रक्रिया...!! कसली शश्त्रक्रिया?"

जीनीने आपली बॅग उचलली... दार बाजूला सरकवून पाऊल बाहेर टाकत म्हणाली.... "जॉनी चा जीनी होण्याची!!!"