"हॅलो..प्रदेशाध्यक्ष साहेब..तात्याराव बोलतो"
"हा बोला.."
"आमच्या तिकीटाचं सांगणार व्हते तुमी?"
"तिकीट कन्फर्म आहे तुमचं ह्यावेळी..खोके पाठवा आन तयारीला लागा निवडणुकीच्या"
"बरं...करतो व्यवस्था.."
काही दिवसांनी..
"प्रदेशाध्यक्ष..गेम खेळू नका आमच्यासोबत..आप्पासाहेबाकडून पन खोके मागवल्याची खबर लागली आम्हाला"
"विश्वास नाही का आमच्या शब्दावर? इलेक्शनसाठी मागवले त्यांच्याकडून खोके..तिकीट तुम्हालाच मिळणार तात्याराव ..कन्फर्म!"
"मिळायलाच पाहिजे...लालनबाईचं प्रकरन अजून ताजं हाय....बाईला बोलतं करायला फार वेळ लागणार नाही आम्हाला...ध्यानात ठेवा"
"आहे ध्यानात"
.
.
.
"हॅलो आप्पासाहेब..प्रदेशाध्यक्ष बोलतो.. तात्यारावांचं तिकीट कन्फर्म करावं लागेल असं दिसतंय.."
"मग?"
"करून टाका कन्फर्म..
"बरं.."
"तात्याराव मांडलिकांचा अपघाती मृत्यू"….. पेपरमधील बातमी..
"द्रष्टे नेतृत्व हरपले," प्रदेशाध्यक्षांची शोकसंवेदना.