[शशक' १९] - भेट

दरवाजा उघडला.
तर हा! समोर गुलाबासकट गुलाबाची कुंडी घेऊन...
(हम्मम... मवाली कुठला...)
(तेवढ्यात बाबांचा प्रश्र्न..)
कोण आहे गं?
मी चाचपडत... गोंधळलेल्या अवस्थेत काही बोलणार तोच.
बाबा बोलले "रोपटे घेऊन आलाय...
हा ये रे! तिकडे गॅलरीत ठेव..."

त्यानेच दिलेल्या कुंडीतलं गुलाब त्याच्या उशाशी ठेवून मी निघाले...
निघण्यासाठी दरवाजा उडण्या आधी पुन्हा एकवेळ वळुन त्याच्याकडे पाहीलं. तो एकटक माझ्याकडे पाहत होता. आजुबाजुला स्तंब्धता, शांतता आणि व्हेन्टीलेटरचा भीतीदायक आवाज. माझे डोळे बांध फुटावा असे वाहत होते...

मी दार उघडला आणि मेंहदी भरलेल्या पावलांनी धावत सुटले... व्हेन्टीलेटर शिवाय कसलाच आवाज ऐकू येत नव्हता. खळकन काचा फुटल्या. अकराव्या मजल्यावरून खाली...
आणि वार्डचा दरवाजा बंद झाला.