[शशक' १९] - ज्योतिष

गुरुजी - "मुलाच्या कुंडलीत राजलक्षण आहेत, फक्त पाण्यापासुन जपा, खुप जपा"
...
...
"आज्जी, सगळेजण जातात सोसायटीच्या पुलमध्ये पोहायला, दहा फुटावरुन उडीपण टाकतात. मीच का नाही जायचे?"
"नको रे बाळा, जाउदे त्यांना, तु हा लाडु खा"
"जाउदेना आई त्याला, पोहायला शिकला तर कसला धोका रहाणार नाही. मी पुर्णवेळ जवळ थांबेन."
"नवसाने झालेले एकुलते पोर, खबरदार पाण्याजवळ नेलेस तर"
...
...
'छे, आता घरी विचारण्यात अर्थ नाही. आजी उगीचच घाबरते. सगळे मित्र हसतात मला. दिवसा शक्य नाही, पण रात्री पुलाजवळचे लाईट बंद झाल्यावर चांगली दहा फुटावरुनच उडी टाकतो, बंटीचे लाईफजॅकेट घालुन.'
...
...
'ठपप..'
वॉचमन - "काय पडलं टँकमधे आता? तळाचे प्लास्टरींग रिपेअर करायला आजच तर रीकामा केला होता