[शशक' १९] - दोन ध्रुवावर दोघे आपण

"हॅलो" ! फोटो स्टुडिओ का ? मी आरुष बोलतोय
समोरून अगदी मंजुळ आवाज आला , "मी आश्लेषा बोलतेय" !
धागे जुळत गेले , एक दिवस काळाघोडाला भेटीचं ठरवलंच पण भलताच दैवयोग्
ती:- तू आला का नाहीस ?
तो:- मी आलो होतो ना !
तो:- ओके , शेवटचा चान्स , संध्याकाळी शिवाजी पार्कात भेट
ती:- तिथे जेल आहे वेडी आहेस का?
तो:- खोटारडी आहेस
ती:- गपबस , परवाच फोटो काढला तिकडे
थोडावेळ स्मशानशांतता अन परत फोन झाला
ती:- सॉरी , रागावून बोललो आपण दोघे
तो:- मला कळलं आहे, "आपण कधीच भेटू शकणार नाही"
ती:- का?
तो:- आपण समांतर विश्वात (मल्टिव्हर्स) आहोत , त्यांच्याकडा जुळल्यानेच फोन लागला
ती:- बर तडफड तिकडेच मग !