"मी आई होणार हे समजल्यावर तुला आनंद नाही झाला? मख्खासारखा जेवणावरुन उठून गेलास? किती विचित्र वाटले? आई बघ किती आनंदात आहेत, त्यांचे प्लॅनही सुरु झाले"
“ भोळी आहे बिचारी, अज्ञानात सुखी आहे . पण माझे काय? तुझ्या सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आहेत हे माहीत असूनही मी आनंदाचे नाटक करू? तू आई होऊच शकत नाहीस हे माहीत असताना खोटे बोलून काय मिळाले तूला? त्यापेक्षा दत्तक घेण्याचा पर्याय का स्विकारत नाहीस?”
“मी मुल दत्तक घेणार नाही कारण माझे नाही तर तुझे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. पण स्वत:चे न्यून लपवण्यासाठी तू दोष माझ्यावर ढकललास.... आणि ज्यावेळी हे मला समजले त्याचवेळी मी आई होण्याचा निर्णय घेतला.”