[शशक' १९] - क्रॉस कनेक्शन

तो : आज नक्कि ना ?
मी : हो .
तो : कसं ओळखायचं ?
मी : लाल रंगाचा कुर्ता ,पांढर्या रंगाचा पायजमा घालेन .
तो : मी ऑरेन्ज शर्ट त्यावर ब्लॅक लाइन्स ,काळी पँट.
मी : ९ वाजता . भारत कॅफे .
तो : डन .
.पहिल्यांदाच भेटणार होतो . सोशल मिडियावरची ओळख . एक्साइटेड.
सकाळची कामं आवरली . इशाचा टिफिन , शाळेची घाई आवरुन मिलिंदचा ब्रेकफास्ट .
”आज साडेआठला निघेन .कॉल आहे एक ,तो आवरुन मिटिंगलाच जाईन “ .
झाली का पंचाईत . हा निघाल्याशिवाय निघणं कठिण .
तो निघाला कि लगेचच निघु म्हणत घड्याळाकडे पाहिलं . ७ :५० .केसांना कंडीशनर मेहेंदी लावुन , चेहर्यावर फेस पॅक लावुन बेडरूम मध्ये आले तर हादरलेच .
बेडवर ऑरेन्ज कलरचा, काळ्या लाइन्स असणारा ठेवनीतला शर्ट ,ब्लॅक पँट .
“मिलिंद ?? “