[शशक' १९] - कदाचित

नुकतेच इंजिनीअरींगच्या शेवटच्या वर्षाला आलेले दोन मित्र . कॉलेजमधल्या टिचींग , नॉनटिचींग स्टाफचे आवडते . एकमेकांचे रुमपार्टनर . आज उत्साहाने गप्पा मारत होते . करीअरची स्वप्ने रंगवत होते .

एका मित्राने सुचवले .

" मित्रा , मी ठरवलं आहे . यावर्षी प्रोजेक्टसाठी प्रिन्सीपॉल हजारशब्दे हेच आपले गाईड असणार . त्यांच्या ज्ञानाचा , अनुभवाचा आपल्याला चांगला उपयोग होईल . "

रुमपार्टनर चपापुन सावधपणे म्हणाला .

" जॉय दोस्ता , हजारशब्दे सर तापट आहेत . आयत्यावेळी तोंडघशी पाडतात . शहाणा असशील तर थोडा विचार कर . "

" ठिक आहे यार . " जॉय म्हणाला .

एक वर्षानंतर , पहिल्या पाचांत आल्याबद्दल कॉलेजतर्फे जॉय आणी त्याच्या मित्राचा सत्कार होत होता .

दोघांच्याही पालकांना हा समारंभ पाहुन भरुन येत होते .

कॉलेजमधे नव्यानेच आलेले ३ जुनीअर्स हा सोहळा कौतुकाने बघत होते .