"तुमच्या शेजारचं घर घेतलंय. थोडी माहिती हवी होती?"
"मी एकटीच असते. चौकशा दुसरीकडे करा."
"आई....... मी या गावातच नवीन आहे. कुठे जाणार?"
"आई?!!! हम्म! कोण बरं हाक मारायचं ही??? कुठचा तू? घरी कोण असतं?"
"मुंबई. घरी फक्त आई. आता इथे सेट झालो की आणीन तिला."
"अरे? एकटाच आहेस इथे? ये आत!"
….........."रामभाऊ, परवा जानकीआक्का गेल्या. मुलगा परदेशात गेल्यानंतर आक्का खुळावल्या. गावाचं नाव टाकलं. आण्णा गेल्यानंतर त्यांना पोहोचवून आलेल्या मंडळींना देखील दार उघडलं नव्हतं. परवा तिथून जाताना दार उघडं बघून आत डोकावलं; आक्का जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्या होत्या. काही नातं नसूनही अंतिम विधी आम्हीच केले. लेकाला कसं कळवणार? कुठे असतो कोणास ठाऊक?"