अटलजींनी, २ खासदार संख्या असलेल्या भाजपच्या कितीतरी आधीपासून, आणि नंतरही कितीतरी वर्षे, भाजपची धुरा सांभाळली. त्यांनी ८० च्या दशकातच, अनेक तत्कालीन युवा नेतृत्वगुण असलेले उमेदवार हेरून त्यांना ग्रुम केलं. त्यांनी प्रभावीपणे तत्कालीन भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली.
८० च्या दशकात महाजन/स्वराज/राजनाथसिंह (व इतर अनेक) यांचे कर्तृत्व अटल बिहारी वाजपेयी यांनी बरोबर हेरले. भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली.
मोदीजींनी गेली काही वर्षे भाजपाची धुरा सांभाळली आहे. गेल्या काही वर्ष्यात भाजपाला केंद्रात व अनेक राज्यात सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. नुकत्याच झालेल्या (डिसेंबर २०१८) विधानसभा निवडणुकीतील पराभवाने भाजपाला थोडासा धक्का नक्कीच बसला आहे, परंतु त्यामुळे सुतक करावे असं काही वातावरण नाही. आजवर अनेक पेचप्रसंग आले आणि गेले पण, त्यातून निभावून जाण्याची क्षमता/अनुभव मोदीजींत नक्कीच आहे.
मोदींवरती श्रद्धा असलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षांतर्गत बळ मोदीजींच्या मागे आहे, जनमानसातील त्यांची प्रतिमा अजूनही लोकप्रिय आहे.
पण मोदीजी एकाकी पडलेत का ? भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा विचार केल तर , (प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर) मोदीजींच्या अनुपस्थितीत, भाजपला केंद्रीय निवडणुकीत लीड करायला, दुसऱ्या फळीतल्या (भविष्यात) भाजपचा चेहेरा बनू शकेल असं एकही नाव डोळ्यासमोर येत नाही.
भाजप थिंक टॅन्कच्या निसटलेल्या धोरणांपैकी हे एक असावे काय ?
पक्षांतर्गत-टीना* फॅक्टर भाजपचा डिसऍडव्हान्टेज ठरेल काय ?
(*टीना = There Is No Alternative = अशी पर्सिव्हड राजकीय स्थिती की जिथे नेतृत्वाला पर्याय उपलब्ध नसतो )