
डेक्कन वर जागा मिळेल तिथे स्कुटर पार्क केली व चालायला सुरवात केली
डेक्कन पेट्रोल पंपाजवळ एक जण टोस्ट सॅन्डविच बनवणारा आहे
तो कांदा कापत होता
चॉपिन बोर्ड वर नाजूक बारीक कापलेल्या चिरलेल्या कांद्याचा ढीग होता
त्याच्या हातून सूरी घेत मी ब्लेड च्या थिकनेस चा पाते चिमटीत धरुन अंदाज घेतला
खिश्यातुन पैसे काढत विचारणा केली सूरी कुठून विकत घेतली -मला मिळेल का इत्यादी
पण तो माहिती देण्यास नाखूष दिसला -"साब वो सूरी बनाने वाला गाव को गयेला है -वापस नाही आने वाला
"ठीक आहे" म्हणत मी रुपाली ला आलो चहा घेतला
थोडक्यात ब्लेड चे पातळ पाते हे कांदा बारीक कापण्याचे सिक्रेट होते
डोक्यात विचार होते --अन क्लिक झाले
रुपालीच्या बोळात व्हीनस चे स्टेशनरी दुकान होते तिथून कटर घेतला
बोटाच्या चिमटीत पकडून ब्लेड ची थिकनेस चेक केली
ती मला हवी तशी होती
घरी आल्यावर कटर च्या साहाय्याने कांदा कापला
बारीक नाजूक कापला गेला
कांदा कापायाला मी हल्ली कटर वापरतो
जरूर एकदा ट्राय मारा