मिपावरच्या धाग्यात लाईक सदृश्य बटण कसे समाविष्ट करावे.

मागे एकदा मिपा वरील धाग्यांना रेटिंग असावे का? अशा प्रकारची चर्चा वाचनात आली होती. त्यावर आलेल्या प्रतिसादांमध्ये रेटिंग नको, परंतु वाचकांना लेखन आवडल्याची पोच देण्यासाठी लाईक सारखे बटण असावे असा सूर होता आणि तो योग्यही वाटला.

मिपावरच्या धाग्यांमध्ये 'Applause Button' ह्या थर्ड पार्टी सर्व्हिसचा वापर करून आपण वाचकांना ती सोय सहज उपलब्ध करून देऊ शकतो. रियल टाईम अपडेट होणाऱ्या ह्या बटणावर क्लिक करून मिपाचे सदस्य नसलेले नित्यवाचकही लॉग इन न करताही आपली पसंती कळवू शकतात.

खाली दिलेला १० ओळींचा छोटा कोड कॉपी करून लेखात सर्वात शेवटी पेस्ट करायचा. त्यातल्या 'लेखन आवडले !' 'च्या ऐवजी ''लेख आवडला' , 'कविता आवडली', 'कथा आवडली', 'पाककृती आवडली', 'माहिती आवडली' 'असे बदल देखील करता येऊ शकतात.

हे बटण धाग्याच्या url वर आधारित असल्याने प्रत्येक धाग्याला मिळालेल्या लाईक्स स्वतंत्रपणे साठवल्या जातात.

<html><meta name="viewport" content="width=device-width, initial-scale=1">
<meta charset="utf-8">
<link rel="stylesheet" href="https://unpkg.com/applause-button/dist/applause-button.css">
<script src="https://unpkg.com/applause-button/dist/applause-button.js"></script>
</head><body>
<table><tr><td style="padding:10px;">
लेखन आवडले !
</td>
<td style="padding:10px;"><applause-button style="width: 70px; height: 70px;"/></td></tr></table></body></html>

चला तर मग आपले लेखन जास्तीत जास्त परस्परसंवादी (Interactive) करण्यासाठी आपल्या धाग्यांमध्ये आजपासून हि सुविधा वापरायला सुरुवात करूया.

धाग्यात समाविष्ट केल्यावर ते बटण खालील प्रमाणे दिसेल, टाळी वाजवणाऱ्या हातांवर क्लिक करून वाचक आपली पसंती दर्शवू शकतात.

टर्मीनेटर

माहिती आवडली !