मोबाइल - होल्डर ( D I Y )

***********************
कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा
************************

मोबाइल हँडल ( DIY )

रेल्वेतून अथवा गर्दीत किंवा ट्रेकिंगमध्ये मोबाइलने फोटो,व्हिडिओ काढताना तो हातातून निसटू नये म्हणून केलेले हँडल.
बाजारात मिळणारे प्लास्टिक कवर - त्यालाच दोरी बांधायची.
फोटोसाठी "Easy Selfie free" हे कॅम्रा अॅप वापरायचं. आवाज करून शटर चालू करता येतो. फोकसिंग होऊनच फोटो निघतो. जिथे सेल्फि स्टिक वापरता येत नाही अथवा जवळ नसते तेव्हाही उपयोगी.
फोटो १)

फोटो २)

फोटो ३)

सूचना: दोरी त्या कवरमध्ये लूप करून घ्या. एकदा दोनदा ओढून खात्री करा. जुने कवर वापरू नका. मनगटातून दोरीचे वेटोळे सहज सुटणार नाही असे पाहा.
रेल्वे डब्याच्या दारात एका हाताने दांडा धरून दुसऱ्या हाताने मोबाइलने फोटो व्हिडिओ सहज जमतो. कॅम्रा बटणाकडे बोट येईल अशी दोरी बांधा. काही मोबाइलात व्हॅाल्युम डाउनचे बटण शटरसाठी असते तेसुद्धा सहज वापरता येईल. समारंभात हात उंच करून डोक्यावर धरून पटापट फोटो काढता येतात. ट्रेकिंगच्यावेळी चालत सेल्फि व्हिडिओ काढत चालत राहता येते.
करून पाहा. मी तीन वर्षे वापरत आहे.