पावसाळी हवा झाली आणि काही तरी चटपटीत खायची इच्छा झाली. घरी मस्त दाबेली चा बेत केला.
साहित्य
पाव, मसाला दाणे, बारीक शेव
उकडलेले बटाटे। 4-5
चिंच खजूर चटणी
पुदिना कोथिंबीर चटणी
बारीक चिरलेला कांदा
डाळिंब दाणे
बटर
गरम मसाला, पावभाजी मसाला, चाट मसाला, तीखट, मीठ
क्रुती
कढईत तूप गरम करून त्यात 3 पळ्या गोड चटणी घाला. त्यात कुचकरलेले बटाटे, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा पावभाजी मसाला, 1/2 चमचा चाट मसाला , चवीनुसार मीठ आणि तिखट घाला. सर्व नीट मिसळून घ्या. सारण तयार
एक पाव घेऊन मधून चीरा. दोन साइडने. पूर्ण आडवा कापायचा नाही.
एका बाजूला गोड चटणी, एका बाजूला तिखट चटणी. मधे एक चमचा सारण, थोडे दाणे, थोडे डाळिंब दाणे भरून घ्या.
तवा गरम करून बटर सोडून, तयार पाव दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा
वरुन बारीक शेव घालून खायला द्यावे