आमची मराठी वेब सिरीज

नमस्कार,

  • आजच्या धावपळीच्या जगात लोकांमधला खरा संवाद हरवत चाललाय असं तुम्हाला वाटतं का?
  • घरात, बाहेर सगळीकडे सर्वजण आपापल्या मोबाईल-कॉम्पुटर मध्ये डोकं खुपसून बसलेत असं तुम्हाला वाटतं का?
  • पुढच्या पिढीचे गॅजेट ऍडिक्शन मुळे वांधे होणार आहेत अशी तुम्हाला सतत चिंता वाटते का? या चिंतेमुळे तुम्ही एक-दिवसाआड उसासे सोडत आपलं ब्लडप्रेशर वाढवत आहात का?
  • घरोघरी सतत चालू असणारे टिव्ही., त्यावरच्या अमृत-प्राशन केलेल्या मालिका - यात रमणार्‍या कुटूंबातील प्रत्येकाचं घरातल्या माणसांशी नातं आणि संवाद दोन्ही तुटत चाललंय, असं तुम्हाला वाटतं का?
  • तुमची मुले सदानकदा कॉम्पुटरवर गेम्स खेळत बसलेली असतात असं तुम्हाला वाटतं का?
  • “कॉम्पुटर बंद कर!”, असं सांगितल्यावर "मला बोअर होतंय" असं म्हणत तुमची मुलं तुमचं डोकं खातात का?
  • शासनाच्या धोरणामुळे मैदानाची संख्या कमी झालीये आणि ट्रॅफिकमुळे मुलांना खेळायला रस्ते सुरक्षित नाहीत असं तुम्हाला वाटतं का?
  • तुमची नातवंड तुमच्याकडे येतात तेव्हा ते “नवीन काहीतरी सांगा आजोबा/आजी” असं म्हणतात का?
  • कॉलेजच्या होस्टेलमधल्या रूमवर मित्र आले की लॅपटॉप वर पिक्चर बघत बसण्याचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?
  • तुम्हाला कधीतरी अचानक लहानपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यां आठवून नॉस्टॅल्जीक वाटतं का?

या आणि अशा गोष्टींमुळे तुम्ही चिंताक्रांत झाले आहात का? झाले असलात - (किंवा नसलात) - तर तुमच्यासाठी आम्ही एक मराठी वेब सिरीज घेऊन येत आहोत - ज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या बैठ्या खेळांचे नियम शिकवू.

हे खेळ तुम्ही आपल्या मित्र/मैत्रिणी/मुले/पालक यांसोबत खेळा आणि वरच्या सर्व चिंतांपासून मुक्ती मिळवा.

या सिरीज मधला दुसरा व्हिडीओ इथे पहा

https://youtu.be/Z3_HTR101BQ

हा आमच्या फावल्या वेळातला उपक्रम आहे. आम्ही व्हिडीओ मेकिंग मधले प्रोफेशनल नाही आहोत आणि या विषयातलं बरंच काही नुकतंच इंटरनेटवर शिकलो आहोत.

तुम्हाला व्हिडीओ आवडले तर लाईक/सबस्क्राईब जरूर करा! काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कळवा.

धन्यवाद!

- चहा-बिस्कीट प्रोडक्शन