या अगोदर मी पेन्सिल शेडींगमध्ये केलेले एक 'सेल्फ पोर्ट्रेट' टाकले होते. पण ते माझे मलाच फारसे आवडले नव्हते. त्यावर जास्त कामही करावे वाटत नव्हते जास्त. एकून 'कमीत कमी काम करुन जास्तीत जास्त परिणाम साधायची कला' काही आपल्याला ईतक्यात साधणार नाही हे लक्षात आले. त्या मुळे सरळ ०.५ चा पेन घेतला आणि सर्व पोर्ट्रेट गिरगीटून टाकले. आणि पेन्सिलचा सर्व भाग इरेझरने खोडून टाकला. आता याला 'पेन-वर्क' म्हणता येईल. याच्याकडे सेल्फ पोर्ट्रेट म्हणून न पहाता फक्त 'पोर्ट्रेट' पहावे ही विनंती.
