मी करून पाहिलेली सुका मेवा चपाती
कृती-१
प्रथम एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर ग्यास बंद करा व त्यात 6 बादाम, २ आक्रोड, 12 काजू आणि 12 पिस्ते टाका. यानंतर साधारण ५-७ मिनिटानंतर पाणी काढून टाका तसेच बदाम सोलून घ्या.

सोबतच दुस-या एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर त्यात ५-६ काळया खारका टाका यानंतर साधारण ३० सेकंदा नंतर ग्यास बंद करा . यानंतर साधारण ५-७ मिनिटानंतर पाणी काढून टाका आणि खारका मधील बिया काढून घ्या.

कृती-२
यानंतर यात चांगल्या प्रकारचा गुळ (प्रमाण-आवडीनुसार ) टाकून मिक्सर मधून फिरवून घ्या

कृती-३
हे मिक्सर मधील वाटण मळलेल्या कणिक मध्ये पुरण भरतात तसे भरावे

कृती-४
शेवटी वाटण भरलेल्या काणिकाच्या गोळ्याची चपाती लाटावी
