वालाची उसळ

.
ब-याचश्या गृहिणी कडधान्ये घरातच भिजवतात व त्याला मोड आणतात
आमच्या कडे आम्ही दोघेच असल्याने तसे करत नाही
मोड आलेली कडधान्ये विकत आणतो उसळी साठी
डेक्कन वर डेक्कन पोस्ट ऑफिस आहे त्याला लागून एक गल्ली आहे
तिथे एक माउली कडधान्ये विकते दर्जा उत्तम असतो
पेरू गेट पोलीस चौकीला लागून एक दुकान आहे त्या तिथे पण एक जण कडधान्ये विकते
मूग-मटकी-वाल-मसूर पांढरा व हिरवा वाटाणा अशी सारी कडधान्ये तिथे विक्रीला असतात
काल तिच्या कडून बिरड्या (वाल) विकत घेतले
ओलंखोबरे कोथिंबीर आलेलसूण हिरव्यामिर्च्यांचे वाटण केले
कांदा टोम्याटो परतला व मिश्रण छान एकजीव केले कोरडे मसाले मीठ आदि टाकले
काही वेळा विकतचे वाल चांगले शिजत नाहीत टचटचीत राहातात
त्यामुळे कुकर मधून वाल शिज वून घेतले होते
वाफ निधाल्यावर कुकर उघडले अन बोटाने वाल शिजले का ते पाहिले
वाल यावेळी प्रमाणा पेक्षा जात शिजले होते
बोटाने दाबून पाहिले तर पीठ होत होते
तसेच ते वाल मिश्रणात टाकले
वाल परतानाच जाणवत होते वालाचे तुकडे होत आहेत
उकळी येऊन तपासले तर वाल बारीक तुटले होते
वालाची उसळ करायची होती
पण वालाची आमटी झाली
अर्थात वाटण मसाले प्रमाणात असल्याने आमटी चवदार झाली