आजीच्या पाककृती(१) खाटं वरण.

खुपदा असं होत की नुस्ता वरण भात खायचा कंटाळा येतो त्यासाठी ही वरणाचीच पाककृती.

वरण- १वाटी
तूप ३ते ४ चमचे
जिरे , मिरची,मीठ चवीनुसार.

कृती एकदम सोप्पी तुप-जिरे-मिरचीची फोडणी करुन वरणावर घालायची मिश्रण एकजीव करायचे आणी गरम भात/पोळीशी खावयाचे.