व्हेजिटेबल मुर्ग मुसल्लम

MurghMissallam-1

साहित्य
१ छोटी कोंबडी, साधारण ६०० ते ७०० ग्राम, स्किन सकट

मॅरिनेशन साठी
१/२ वाटी दही
१ लिंबाचा रस
१ चमचा गरम मसाला
१ चमचा लाल तिखट
२ चमचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची ची पेस्ट
२ मोठे चमचे तेल
मीठ, चवीनुसार

सारणासाठी साहित्य
१/४ वाटी मटार
१ छोटा बटाटा, चौकोनी छोटे तुकडे करून
१ छोटा गाजर, चौकोनी तुकडे करून
१ छोटा टोमॅटो, चिरून
२ मध्यम आकाराचे कांदे, उभे चिरून
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/२ इंच आलं, बारीक उभं चिरून
१ चमचा तूप
२ मोठे चमचे तेल (कांद्या साठी)
मीठ, चवीनुसार

मुर्ग मुस्स्लम, हि एक खास मुघलाई पाककृती, ज्यात अख्खी कोंबडी वापरून, त्यात अंडी भरून, कोरडी किंवा मसालेदार घट्ट साँस मध्ये शिजवली जाते. हि पाककृती, रणजित राय ह्यांच्या "तंदूर, दि ग्रेट इंडियन बार्बेक्यू" पुस्तकातली आहे. ह्यात आपण भाज्या वापरून कोंबडी भरतो, म्हणून व्हेजिटेबल मुर्घ् मुसल्लम.

कृती
चिकन स्वच्छ धुवून, कोरडं करून घ्या. एका भांड्यात मॅरीनेशनच साहित्य एकत्र करून, ते चिकनला आतून आणि बाहेरून लावून घ्या. हे चिकन फ्रीज मध्ये किमान २ तास मुरत ठेवा.

Step1  Step2

step3  Step6

पॅन मध्ये २ चमचे तेल तापवून उभा चिरलेला कांदा खरपूस भाजून घ्या.

Step3  Step4

पॅन मधून कांदा बाजूला काढून, त्याच पॅन मध्ये १ चमचा तूप गरम करून, त्यात हिरव्या मिरच्या, आल्याचे काप टाकून, २ मिनिटे परतून घ्या. ह्यात आता भाज्या घालून, त्या साधारण ८०% मंद आचेवर शिजवून घ्या. चवीनुसार मीठ घालून, मिश्रण थंड करायला ठेवा. मिश्रण थंड झालं कि त्यात तळलेला कांदा कुस्करून घाला.

Step6  Step7

हे सारण आता आपल्याला कोंबडीत भरून घायचे आहे. सारण आत भरून, कोंबडी सुई दोऱ्याने शिवून घ्या, म्हणजे सारण बाहेर पडणार नाही.

Step8  step8

कोंबडीचे पाय एकत्र बांधून, हि कोंबडी आपण ओव्हन मध्ये साधारण १८० ते १९० डिग्री वर, ४५ ते ५० मिनिटे भाजून घायची आहे. [ओव्हन नसल्यास, ग्रिल पॅन वर, किंवा कुकर मध्ये थोडं तेल टाकून भाजून घ्या. पॅन किंवा कुकर मध्ये कोंबडी शिजवताना दर १० ते १५ मिनिटांनी परतत राहा, म्हणजे कोंबडी सगळीकडून छान भाजली जाईल.

Step9  step10

मस्त तवा पराठ्या सोबत आणि एखाद्या रायत्या सोबत खायला घ्या!