तर मित्रानो , आजपासून मी आपल्यासाठी ( अर्थात पुरुषांसाठी फक्त ) , हा महिना स्पेशल पाकृ आणणार आहे . मी चहाचा शौकीन असल्याने सुरुवात चहापासून करत आहे . पण त्याआधी दोन ओळी ( सवयीप्रमाणे सादर करीत आहे .. ह घ्या )
बायको गेली तिच्या आजोळी
चहा प्यावा वेळीअवेळी
टाकावी थोडीशी लवंगी कापून
रडावं तिच्या नावानं गळा काढून
तर मंडळी असा हा फर्मास चहा मी इथे पाकृ मंचावर आपल्यासाठी घेऊन येत आहे .
लागणारे साहित्य :
एक छोटा टोप, दोन चमचे साखर , एक चमचा चहापावडर आणि थोडं आलं आणि फक्त नि फक्त एक लवंगी मिरची
कृती : सर्वात आधी टोप घ्यावा , दीड कप पाणी घ्यावे . ते मस्त उकळू द्यावे . त्यामध्ये वरील प्रमाणे चहापावडर आणि आले टाकावे . तेही उकळू द्यावे . चहाचा सुगंध जरा दरवळू द्यावा आणि मग त्यामध्ये साखर टाकावी . सर्व उकळी व्यवस्थित आली कि त्यामध्ये वर जी सांगितली आहे " लवंगी मिरची ती घ्यावी . तीच शेंडीकडचा भाग , (भाग नव्हे तुकडा ) कापून त्या उकळणाऱ्या चहामध्ये घालावा . थोडा असा हिरवट लाल रंग येईल मग पटकन गॅस बंद करावा . आणि तो चहा लगेच स्वतः प्यावा .
मित्रानो तर हा कावा , तुम्हीही एकदा घरी करावा , तोंड लाल होण्यासाठी वेळ मिळावा , म्हणून फक्त एखादा रविवार निवडावा ..
उर्वरित पाकृ भाग पुन्हा येईल , तोपर्यंत नमस्ते , जयहिंद जय महाराष्ट्र ... क्रमश:
सिद्धेश्वर विलास पाटणकर