ग्रिल्ड पॉम्फ्रेट इन लेमन गार्लिक बटर

Main 1

साहित्य

३ ते ४ मध्यम आकाराचे पापलेट, अख्खे, साफ करून, चिरा मारून
१/२ वाटी अमूल बटर
१५ ते २० लसूण पाकळ्या
२ चमचे मीठ
२ चमचे काळीमिरी पावडर
१ चमचा मिक्स्ड हर्ब्स/ओरेगॅनो सीझनिंग
१ चमचा रेड चिल्ली फ्लेक्स
एका लिंबाचा रस
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

पापलेटला काळीमिरी आणि मीठ, आतून बाहेरून लावून साधारण १५ ते २० मिनिटे ठेवावे. तो पर्येंत लेमन गार्लिक बटर बनवून घेणे.

1   2

एका छोट्या कढईत, बटर घालावे. गॅस मंद ठेवून त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. मंद आचेवर लसणीचा छान वास सुटेस्तोवर हलवत राहावे (लसूण जळता कामा नये). लसूण शिजला, कि त्यात मिक्स्ड हेर्ब्स, चिल्ली फ्लेक्स घालून अजून १ ते २ मिनिटे बटर हलवून घेणे. गॅस बंद करून त्यात एका लिंबाचा रस घालावा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. मिश्रणाची चव घेऊन मीठ घालावे.

3 4 5

ग्रिल पॅन मोठ्या गॅस वर चांगला तापू द्यावा. ब्रश ने थोडंसं तेल लावून, पॅन वर पापलेट भाजायला घ्यावा. एका बाजूला साधारण ३ ते ५ मिनिटे भाजून मग पापलेट दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावा.. दोन्ही बाजूने भाजून झाला कि वरून ब्रशने लेमन गार्लिक बटर दोन्ही बाजूने लावून गरम गरम पापलेट सलाड सोबत सर्वे करावा!
6  6

बटर, लसूण, आणि लिंबा मुळे एक अप्रतिम चव येते. अर्थातच पापलेट जितका ताजा तितकी जास्ती ह्याची मज्जा!