सोया चंक्स आणि खजुराचे पौष्टीक लाडू

सोया चंक्स आणि खजुराचे लाडू

मुलाला डब्यात देण्यासाठी एखैदा पौष्टीक पाककृती शोधत होते. घरात सोयाबीन चंक्सचे पीठ व खजूर शिल्लक होते. त्याचा वापर करायचे ठरविले .

साहित्य -

1 मोठी वाटी सोया चंक्स चे पीठ (मी हे चक्कीतून दळून आणते)
1 नेहमीची वाटी कणीक
1 वाटी तूप (फोटोमध्ये कमी दिसत असले तरी मी नंतर वरुन घातले आहे.)
12-15 खजूर बीया काढून
1 वाटी चिरलेला गूळ
अर्धी वाटी पीठीसाखर
10-12 काजू पाकळ्या
10-12 बदाम
अर्धा चमचा वेलची पावडर
साहित्य

प्रथम खजूर, काजू, बदाम व गूळ मिक्सर मधून फिरवून घ्यावे थोडे भरडसर राहिले तरी चालेल. निम्मे तप घालून कढईत घालून पीठे खरपूस भाजून घ्यावीत. पीठ मध्यम आचेवर भाजावे. साधारण 15-20 मि. नंतर पीठाचा रंग गडद होईल व खरपूस वास सुटला की बंद करावे. गरम असतानाच त्यात खजूराचे मिश्रण, पीठी साखर व वेलची पावडर घालावी. उरलेले निम्मे तूप घालून कालवून घ्यावे. कोमटसर असतानाच लाडू वळायला घ्यावेत. या मिश्रणात माझे छोट्या आकाराचे 30 लाडू झाले. हे लाडू चवीलाही खमंग लागतात व पौष्टीकही आहेत.

लाडू