गाडीच्या इंजिनात शिरणारे उंदीर कसे रोखावेत?

मागच्या महिन्यात मी १० -१२ दिवस बाहेर असल्याने गाड़ी पार्किंग मधेच उभी होती, हीच संधी साधून २ लहान डुकराएवढ्या उंदीर/घुशिंनी गाडीच्या इंजिनात संसार थाटला होता. गाड़ी चालू होत न्हवती म्हणून बाजुच्या ग्यारेज मधून मेकनिक आणून तपासले असता समजले की, उंदीर मामाने वायरिंग कुरतडली आहे. ब्याट्रीतुन इंजिनला पॉवर सप्लाय होत न्हवता. पण धक्का मारून चालू होत होती. दुसरया दिवशी ऑफिसला सुट्टी घेउन ग्यारेज मधे काम करुण घेतले. त्यानंतर व्यवस्थित चालली. बिल झाले ३०० रुपये.

काल जिमला जाताना पुन्हा बंद पडली, त्याच मेकनिक्ला बोलावले, धक्का मारून्ही चालू होईना, मेकनिकच्या मतानुसार हा उंदराचाच प्रताप आहे, त्याने मागच्या वेळी अजूनही काही वायरी खाल्ल्यात त्यामुळ कदाचित शोर्ट सर्किट देखिल झाले असू शकते. गाड़ी रात्री त्याच्या ग्यारेज्वर लावली, यावेळी ऑफिसला सुट्टी घेऊ शकलो नाही.

गाड़ी निदान सुरु झाली तर तिला टाटाच्या अधिकृत सर्विस सेंटरमधे दाखल करायची आहे. १५ दिवस अगोदर सर्विसिंगला दिली तेव्हा त्यांना या उंदीराचे प्रताप सांगायचे विसरलो मी त्यांना. उंदीर जरी लहान असला तरी त्याने दिलेला मनस्ताप खुप मोठा आहे. नेमक्या कामाच्या वेळेला गाड़ी रुसून बसली तर पुढचे सगळ प्लानिंग बोम्बलते.
नो एंट्री नावाचे एक औषध आणले होते इंजिनवर फवारायला, परंतु ते लावल्यावर उग्र वास येतो अणि निदान २ दिवस गाड़ी वापरायची नाही अणि वापरली तर एसी लावायचा नाही, हे झेपणार न्हव्ते म्हणून ते औषध अजुन तसेच पडून आहे. गायछाप तंबाखूची पुड़ी देखील सॉक्स मधे बांधून ठेवली आहे इंजिनला, पण मेकनिक म्हणतो यावर काहीही उपाय नाही.

आपल्याकडे काही उपाय आहेत का? कृपया सांगावे, आभारी राहीन.