आवळ्याचं लोणचं

AmlaPickle1

साहित्य

१५ ते २० आवळे
३ चमचे मोहरी
२ चमचे मेथ्या
२ ते ३ चमचे लाल तिखट [थोडेसे काश्मिरी वापरले, तर रंग छान येतो]
१ चमचा हळद
१ चमचा हिंग
२ ते ३ मोठे चमचे तेल, फोडणीसाठी
मीठ, चवीनुसार (मला साधारण ३ ते ४ चमचे लागले)

कृती

एका पातेल्यात आवळे बुडतील एवढे पाणी घालून, त्यात एक चमचा हळद टाकून, झाकण ठेवून, आवळे 5 ते ७ मिनिटे वाफवून घ्या [आवळे खूप शिजवून घ्यायचे नाहीयेत, नाहीतर चिरताना त्याचा लगदा होईल]. आवळे बाहेर काढून गार करत ठेवा.

Step1  Step2

पळी मध्ये २ चमचे मोहरी आणि २ चमचे मेथ्या वेग वेगळे गॅस वर भाजून घ्या. बाजूला गार करत ठेवा. आवळे गार झाले कि त्याच्या मोठ्या फोडी करून घ्या.

Step3  Step4  Step5

मेथ्या आणि मोहरी मिक्सर मधून फिरून बारीक करून घ्या.

Step6  Step7

एका कढईत तेल गरम करून त्यात १ चमचा मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घ्या. ह्यात आवळ्याचे तुकडे घालून ते एक ते दोन मिनिटे परतून घ्या.

Step8  Step9

ह्यात लाल तिखट आणि चवीनुसार मोठं घालून ढवळून घ्या. २ ते ३ चमचे मोहरी-मेथ्या ची पूड घालून, परतून घ्या.

Step10  Step11  Step12

लोणचं स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. एक दोन दिवसात लोणचं मुरलं कि छान लागतं.