प्रिय मित्रहो,
आपण विज्ञानशासित जगात राहतो. खालच्या पानावर scientific revolution शास्त्रीय समजुती कशा बदलतात हे कुन या लेखकाने मांडले आहे. वैज्ञानिक ज्ञानाच्या स्वरुपाबद्दल त्यांचं वरच्या लिंकमधे दिलेलं पुस्तक महत्त्वाचं मानलं जातं.
त्यात खालचा उतारा महत्त्वाचा वाटला -
Normal scientific progress was viewed as "development-by-accumulation" of accepted facts and theories. Kuhn argued for an episodic model in which periods of such conceptual continuity in normal science were interrupted by periods of revolutionary science. The discovery of "anomalies" during revolutions in science leads to new paradigms. New paradigms then ask new questions of old data, move beyond the mere "puzzle-solving" of the previous paradigm, change the rules of the game and the "map" directing new research.
त्याचं हे भाषांतर/सार -
- आजवर शात्रीय पद्धतीने स्वीकारलेल्या सत्यांचा आणि तत्वांचा संचय म्हणजे सामान्य विज्ञान. या अशाच सामान्य विज्ञानाने विश्वाकडे पाहण्याची संकल्पना मधेच कधीतरी नविन क्रांतीकारी वैज्ञानिक उदाहरणांमुळे, घडामोडींमुळे मोडीत निघते. याचे कारण असलेल्या ज्ञानात आणि तत्त्वांत या नविन घडामोडींमुळे काही विसंगती आढळून येतात. या घडामोडी जुन्या माहितीबद्दल नवे प्रश्न उभे करतात. मग वैज्ञानिकांचे "मागच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या मदतीने प्रश्न सोडावयचे" हे काम "नविन स्वरुपाचे ज्ञान निर्माण करणे, मागचे ज्ञान दुरुस्त करणे वा त्यागणे" अशा रुपाचे बनून जाते. अशा वेळी संशोधनाची दिशा बदललेली असते.
भाषांतर समाप्त
===================================================
आजच्या वैज्ञानिक जगाचं हे सौंदर्य आहे कि अनेक क्षेत्रांत संशोधनाची दिशा बदलत आहे. विज्ञान आणि विज्ञानेतर शास्त्रे, अशास्त्रे यांचेतील संबंध चित्रविचित्र, नवनवे चेहरे धारण करू लागले आहेत. खासकरून मानवेतिहास नि समाजशास्त्र यांच्यावर होणारे वैज्ञानिक शोधांचे परिणाम फार रोचक निघत आहेत. अगदी विशुद्ध भौतिक विश्वाची , त्याच्या स्वरुपाची संकल्पना देखील वेळोवेळी बदल पावत आहे. आपल्या जीवनकालात हे सगळं चाललं आहे नि कदाचित आपण अहोभाग्यवान आहोत. खिळवून ठेवणार्या चित्रपटाचा क्लायमॅक्स अजून जवळ येत असणं हे क्लायमॅक्सची आयडीया आल्यापेक्षा जास्त सुंदर! आपण तशाच अवस्थेत आहोत. आपल्यापैकी अनेक जण अनेक वैज्ञानिक क्षेत्रांत काम करत असणार, किंवा तिथल्या क्लायमॅक्सच्या निगडीत बाबींशी परिचित असणार. किंवा अनेकांना अस्साच रस असणार. त्यांनी या धाग्यावर त्या क्षेत्रातल्या ताज्या घडामोडींची लिंक देणे अपेक्षीत आहे. बातमी, ब्लॉग, लेख, व्हिडिओ, इ इ. शिवाय लिंक देणाराने कोणती सद्यकालीन वैज्ञानिक समजूत डगमगणार आहे वा कोणती नविन समजूत प्रस्थापित होणार आहे याबद्दल किमान २-३ ओळी स्वतःच्या लिहिणे मला अभिप्रेत आहे. यात समाजशास्त्र आणि अन्य तत्सम शास्त्रांतील शोध हे देखिल शुद्ध विज्ञानाशी संबंधित असतील टाकायला हरकत नाही.
========================================================
थोडक्यात - विज्ञानाच्या चित्रपटातला क्लायमॅक्स मला किती चांगल्या प्रकारे सांगता आला आहे ठाऊक नाही, पण तुम्ही कोणीही कोणतीही वैज्ञानिक बातमी मराठी वा अमराठी माध्यमात वाचलीत तर त्यातून तुम्हाला पडलेला प्रश्न वा मनात आलेला विचार या धाग्यावर टाका.
--------------------------
प्रत्यक्ष विज्ञानावर बोलण्यात आपण फार टाळाटाळ करतो. नि खासकरून आपण विज्ञान या क्षेत्रातले नसलो तर आपण त्यावर न बोलणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार मानतो. मनातील प्रश्नांचा, विचारांचा मागोवा आपण उपलब्ध प्रत्येक शास्त्राद्वारे घेतला पाहीजे, नि यात विज्ञान देखील आले.
=========================================================
मी दोन उदाहरणे प्रारंभ म्हणून देत आहे.
http://zeenews.india.com/environment/scientists-find-plastic-in-creatur…
या बातमीत प्लास्टीकचा परीणाम कुठपर्यंत पोचला आहे हे सांगीतलं आहे. पृथ्वीवर आता अप्रदूषित काय उरलं आहे असा एक प्रश्न निर्माण होतो. हवा, पाणी, स्पेस, जमिन, ध्रुव, नि आता सर्वात खोल अशा समुद्रातील जागा!
------------------------
https://newatlas.com/geoengineering-climate-chaos-cylcone-drought/52227/
Geoengineering
भूविज्ञान वापरून क्लायमेट चेंज हाताळावा का? ते सगळ्यांवर शेकणार तर नाही? जो एरोसोल वापरून पर्यावरण थंड करायचे आहे त्याचा एखादा "गुणधर्म" नंतर उघडकीस आला तर?