मश्रुम फ्राय

मश्रुम फ्राय
साहित्य:
१ मश्रुमचा चौकोनी पुडा (फूडबझार, स्टार, मोअर मॉल मध्ये मिळतो तो) (धुवून निथळून हलक्या हाताने कापडावर कोरडा करून कापावा )

९ लाल ब्याडगी मिर्च्या (छोट्या कुकरमध्ये, उगा अंगभर पाण्यात १ शिट्टी घेऊन शिजवून, बिया देठं बाजूला काढून, साल मगज निथळून ठेवावे )
१ टी स्पून काळी मिरी
१/२ टेबल स्पून आलं + १/२ टेबल स्पून लसूण
१ टी स्पून फिश सॉस / ऑयस्टर पेस्ट
१ टी स्पून व्हाईट व्हिनेगर
१ टी स्पून साखर
उगाच थोडं मीठ
१ चक्री फुल (थोडा टवका खाऊन खात्री करा चक्री फुल कडू नसेल याची )

१ टेस्पून तेल (तीळ तेल किंवा कुठलंही प्रकारचं न्यूट्रल तेल वापरू शकता )

तीळ गार्निशसाठी

==============================================================
पूर्वकृती : ९ लाल ब्याडगी मिर्च्या (छोट्या कुकरमध्ये, उगा अंगभर पाण्यात १ शिट्टी घेऊन शिजवून, बिया देठं बाजूला काढून, साल मगज निथळून ठेवावे )

नंतर
शिजवलेल्या मिरच्या + आलं + लसूण + मिरे + साखर + मीठ
एक चमचा पाणी टाकून मिक्सरमध्ये गंध वाटून घ्या...

==================================================================

कृती:
कढईत तेल मध्यम गरम करून त्यात चक्री फुल घालाव, सुगंध दरवळू लागताच त्यात, मिक्सरच्या भांड्यातली पेस्ट टाका, साधारण २ मिनिटे परतावे. (मिरची मिरे आलं लसूण) पेस्टचा सुगंध दरवळू लागताच त्यात, कापलेला मश्रुम टाकावा. उलथणीने मसाल्यात सगळीकडून माखून घ्यावा. व्हिनेगर व फिश सॉस शिंपडून मिनिटाभरच्यापेक्षा थोडं कमी परतत राहावं, गॅस बंद करा, तिळाने गार्निश करा.

गरम पोळी / फुलका/ प्लेन राईस बरोबर सर्व्ह करावी.
.
mf