ब्रॉडबँडचा वापर करुन आय पी फोन वापरता येईल का ?

घरातील ब्रॉडबँडचा इंटरनेटचा वापर करुन आय पी फोन वापरता येईल का ?
माझ्या घरी मोबाईलच्या नेटवर्क अनेकदा खूप खराब असते. कॉल ड्रॉप होणे, नीट ऐकू न येणे ई ई चालूच असते [स्थळ : चिंचवड]
पण ब्रॉडबँड इंटरनेट सेवा (आयडिया) बर्‍यापैकी चांगली आहे.
तर या उपलब्ध ब्रॉडबँड सेवेचा वापर करुन मी घरी आय पी फोन वापरु शकतो का ? असल्यास कसे ?

मुख्य उद्देश घरात असताना सहज व नीटपणे कॉल व्हावेत इतकाच आहे म्हणून इतर काही पर्याय असल्यास सुचवू शकता. पण खालील पर्यांयाचा मी आधीच विचार केलाय.
--> दूसरी मोबाईल सर्विस वापरणे. पण या ठिकाणी सगळ्याच सर्विस (थोड्याफार फरकाने) खराब आहेत
--> मोबाईल नेटवर्क बुस्टर वगैरे नावाची साधनं ऑनलाईन बाजारात उपलब्ध आहेत, पण त्यांची विश्वासार्हता माहित नाही आणि नेटवर्कमध्ये उगाच किंचितशी सुधारणा करुन देणारा पर्याय नको आहे.
--> इंटरनेटचा वापरकरुन व्हॉटस अ‍ॅप कॉल केला जावू शकतो (आणि अनेकदा करतोही), पण लँडलाईनवर तसेच व्हॉटस अ‍ॅप न वापरणारे , नेहमी ऑनलाईन नसणारे ई ई यांना कॉल करता येत नाही. शिवाय व्हॉटस अ‍ॅपमधून कॉल करता यावा यासाठी तो क्रमांक आधी मोबाईलवर साठवावा लागतो, जे कंटाळवाणे काम आहे.
--> हँगआउटवरुन कॉल करता येतो, पण भारतातील मोबाईल / लँडलाईनला करता येत नाही
--> स्काईपनेही भारतातील मोबाईल / लँडलाईनला कॉल करता येत नाही