साहित्य
१ किलो चिकन, साफ करून
इतर साहित्य ह्या पाककृती प्रमाणे
कृती
मागे काही लोकांनी व्हेज आणि नॉन व्हेज पाककृती वेगळ्या टाका म्हणून लिहिलेलं, त्यामुळे हि पाककृती वेगळी देत आहे. ह्याची कृती व्हेजिटेरियन ब्रेड स्टु सारखीच आहे, फक्त भाज्यांसोबत चिकन टाकून ते शिजवून घायचं आहे.
चिकन ला मीठ आणि काळीमिरी लावून ३० मिनिटे ते १ तास मॅरीनेट करावे. व्हेजिटेरियन ब्रेड स्टु च्या पाककृती प्रमाणे भाज्या परतून झाल्या कि त्यात चिकन चे तुकडे टाकावेत. साधारण ५ ते ८ मिनिटे भाज्या आणि चिकन परतून घ्या. आता त्यात हळद, गरम पाणी (चिकन बुडेल इतपत) टाकून, झाकण ठेऊन चिकन मंद आचेवर शिजवून घ्या (साधारण २५ ते ३० मिनिटे).
भाज्या आणि चिकन शिजत आले कि पातेल्यात ब्रेड ची पेस्ट टाकून, त्यात काळीमिरी पावडर टाकून मिश्रण ढवळून घ्या. अजून २ ते ५ मिनिटे झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.
चवीनुसार मीठ टाकून, वरून चिरलेली कोथिंबीर पेरून गरमागरम स्टु, खायला घ्या! सोबत हवं तर फ्रेंच ब्रेड चे थोडे बटर मध्ये भाजलेले तुकडे घ्या!