दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - जस्टिस चौधरी

Header2
लेखक :- आदिजोशी
अभिवाचन :- चिन्मय शिंत्रे
पार्श्वसंगीत ऊर्फ ढींच्याकीकरण :- वेल्लाभट

तुम्ही मिपामौक्तिकं गोळा करायला निघाल, तर तुम्हाला हे अखिल मिपाविश्व 'गुंडा' नामक चित्रपटाच्या चर्चेने भरून राहिलेलं दिसेल. पण नेहमी नेहमी काय त्याच झाडावर?! ह्याचा अर्थ मिथुनायणालाच न घेण्याची आमची बिशाद आहे, असं नव्हे!

श्री आदिजोशी ह्यांच्या लेखणीतून प्रसवलेल्या ह्या मिपारत्नाला आवाज दिलाय मा. चिन्मय शिंत्रे ह्यांनी. आणि आधीच छप्पर फाडके महान बनू पाहणार्‍या ह्या कलाकृतीचे ढिंच्याकीकरण केले आहे रा.रा वेल्लाभट ह्यांनी.

अशी ही 'आधीच मर्कट.. त्यात मद्य प्याला' कलाकृती मिपाचरणी अर्पण!

Footer