दृकश्राव्य विभाग :- मार्टिन पुणेकर पाटील

Header2

कधी कधी मिपासाठी काम करताना "याच साठी केला होता अट्टाहास" असं वाटतं. मार्टिनशी ओळख ही त्याच प्रवासाची सुरूवात. मार्टीन हा आपल्या कौशिक लेलेंचा शिष्य. वेल्लाने त्याचा युट्युबवर एक व्हिडीओ पाहुन आपल्या अंकासाठी काही बोलण्याची गळ घातली. तो सुद्धा उत्साही माणूस निघाला आणि त्याने लगेच होकारही दिला. होकार तर दिला पण पहिले आठ पंधरा दिवस काहीच हालचाल नाही. आम्ही आपले मध्येच त्याला हलवून यायचो. देतोय देतोय.. काही तरी काम करतोय.. असं म्हणत म्हणत अंक आठवड्यावर आला. अजून काहीच हाती आले नव्हते.

अखेर एक दिवस महाशय म्हणाले की आपण स्काईप करुया का? आम्ही तर एका पायावर तयार होतोच! स्काईपवर पहिला बॉम्ब फुटला जेव्हा मार्टीन म्हणे मी चाललोय परवा विपश्यनेसाठी पोलंडला! मला खरं तर तुम्हाला सरप्राईज द्यायचंय म्हणे. पण आता वेळ नाही पुरत तर सांगावच लागेल. म्हणलं भाऊ, आक्खं मिसळपाव.कॉम आहे सरप्राईज व्हायला, तू आम्हाला तर दे ना फाईल! म्हणला माझं एक आवडतं मराठी गाणं आहे, त्याच्या बीट्स वर सगळं बसवताना माझा वेळ गेलाय. तरी मी जाईपर्यंत हे काम करणारच. अत्यंत जड मनानी फार तर स्क्रिन प्ले देतो म्हणाला. त्याचं सरप्राईज हजारो लोकांपैकी २ लोकांसमोर फुटलं ह्याचं काय ते अतोनात दु:ख!

आणि महाराज, तो स्क्रिन प्ले पाहिला तोच क्षण जेव्हा वाटलं याच साठी केला होता अट्टाहास!

martin

एका अभारतीय माणसाच्या नजरेतून भारत पहाणं किती मनोहर असू शकतं हे पहिल्यांदा जाणवलं. इतक्या आत्मीयतेने कुणी आपल्या देशाबद्दल बोलतंय ही भावनाच फार सुंदर होती. मार्टीन जाण्याच्या आदल्या पहाटे ४ पर्यंत काम करत राहिला आणि शक्य तितक्या गोष्टी देऊन गेला. पुढे त्याच्या तब्बल ९१ ऑडीओ फाईल्स आणि खूप सारे फोटो घेऊन हा व्हिडीओ मी पूर्ण केला. आता मार्टीनच्या कन्सेप्टला धक्का न लागू द्यायची काळजी घेतली तरी थोड्या तडजोडी कराव्या लागल्यात. त्या सार्‍या चुका पिराच्या खात्यात टाका, दाद मात्र मार्टिनला द्या!

Footer