
कॅमेरामागे : ज्योति अलवनि
कॅमेरासमोर : चिन्मयी सुमित
गोष्ट ... चा पहिला अध्याय चालू असताना ज्योति ताईने सतिश राजवाडेंना साक्षात हजर करुन उपक्रमाला एक अनपेक्षित भेट दिली होती ! काही काही उपक्रम आणि त्यांच्याबरोबर आपणहुन येणारे ज्योति ताईसारखे लोकं यांचे ऋणानुबंधच असतात असं म्हणायला हवं. याही वेळी त्या घेऊन आल्या आहेत आपल्या भेटीला चिन्मयी सुमित यांना. आपल्या व्यस्त कार्यक्रमातुन वेळ काढुन चिन्मयी यांनी त्यांच्या आठवणीतली दिवाळी आपल्यासाठी शेअर केली आहे.
