दृकश्राव्य विभाग :- आरती सप्रेम

Header2
लेखक :- मेघवेडा
अभिवाचन :- वेल्लाभट

सूर जुळावे परस्परांचे... सारख्या ओळी म्हणायला अगदी प्रसन्न वाटतात. पण एकत्र मिळून देवाची आरती होत असताना हे सूर जुळले, तरच आश्चर्य वाटतं. घरातली दहा मंडळी आरती म्हणतानाही टाळ्या आणि टाळ जे काही चौफेर उधळतात आणि शब्दा-सुरांना फरफटत नेतात, ते ऐकणं कमालीचं मनोरंजक असतं. आणि हीच जर सार्वजनिक गणेशोत्सवातली आरती असेल, तर? मग तर काय, कल्ला होतो की नाही!

ऐकू या मेघवेडा यांनी लिहिलेली अशाच एका आरतीची गंमत, वेल्लाभट यांच्याकडून.

Footer