
Roads were made for journeys not destinations' - Confucius
हे विचार ज्याला पटले तोच खरा प्रवासप्रेमी. या प्रवासाचं वेड फार वाईट. ते एकदा लागलं ना की मग तुम्हाला 'कुठच्या कुठे' आणि 'कुठे कुठे' घेऊन जाईल, तुम्हीसुद्धा सांगू शकत नाही. असाच एक प्रवासप्रेमी मिपाकर अभिजीत अवलिया स्वतःची गाडी घेऊन, सहकुटुंब, पुणे - लेह - पुणे असा प्रचंड प्रवास करून आलाय.
त्याच्या या जबरदस्त प्रवासाची कहाणी ऐकूया त्याच्याच कडून.
