प्रसिद्धीचमू सदस्यः वेल्लाभट (ट्विटर), पद्मावति (फेसबुक), पैलवान
प्रसिद्धीचमूचं कामः
अंक येण्यापूर्वी:
ठराविक अंतराने मिपा, तसेच मिपा फेसबुक पान, मिपा ट्विटर हँडल, व्हॉट्सॅप या माध्यमांद्वारे अंकाची झलक/ओळख देणारे, उत्सुकता निर्माण करणारे संदेश प्रसारित करणे. यात मुद्दाम तयार केलेले ग्राफिक्स, व्हिडियो, क्रिएटिव्ह कॉपीज यांचा वापर करून अंकासाठी पार्श्वभूमी तयार करणे.
प्रकाशना दरम्यान:
प्रकाशन टप्याटप्याने होईल असं गृहीत धरल्यास दर फीचर बद्दल फेबु, ट्विटर, व्हॉट्सॅप इत्यादी माध्यमांवर त्याचे दुवे सुयोग्य चित्र, व्हिडियो, व क्रिएटिव्ह कॉपी सहित पसरवणे. अंकाच्या संपूर्ण प्रकाशनादरम्यान अंकाला व्हिजिबिलिटी आणि यूजर एंगेजमेंट मिळत राहील याचा प्रयत्न करणे.
यात कलात्मकतेला भरपूर वाव असल्याने कल्पनांचं, सूचनांचं स्वागत आहे.